Monday, August 17, 2009

राजे

राजे तुम्ही रक्त सांडले स्वराज्यासाठी...
आम्ही आज तुमचे किल्ले बघतो
केवल मजेसाठी ...
तुमच्या मावळ्यानि कड़े चढले
तुमच्या स्वप्नासाठी ...
आम्ही आड़वाटेनेही थकून जातो
किल्ल्यावर जाण्यासाठी ...
तुमच्या सिंहाचे स्मारके
आज युवकांचे दारूचे अड्डे ....
सिंहगडाच्या पायथ्याशी
रेव पार्ट्याचे सडे...
मराठ्याच्या स्मराकांची हे हाल
आता बघवत नाही ..
मराठा असल्याचे
किल्यावर गेल्यावर बोलवत नाही ...
आमची मक्का मदीना आज
धुळी खाली gaadali जात आहे ..
कधी राज्य कर्त्यावर
आज आरक्षण मागण्याची वेळ लादली जात आहे ..
राज गड पासून ते राय गडा पर्यंत च्या
आजही शोधाव्या लागतात वाटा..
हया देशात राजे तुम्ही होतात म्हणुन
आज होऊ शकले बिरला अन टाटा ...
शिर्डीच्या बाबाना सोंन्याचे सिंहासन
अन छत्रपतीच्या समाधीला उन्हाच्या झळा...
शिवजयंतीला निधी करोडोचा करतात गोळा..
राज्याच्या नावावर आज निघतात कित्तेक सेना

Thursday, August 13, 2009

पण

कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर ह्र्दय कधी
जोडतांना असह्य यातना व्हावी

डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये
की पानांना ते नाव जड व्हावे
एक दिवस अचानक त्या नावाचे
डायरीत येणे बंद व्हावे

स्वप्नात कुणाला असंही बघु नये
की आधाराला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या कहीच नसावे

कुणाला इतकाही वेळ देवू नये
की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा

कुणाची इतकीही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी
त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिशाहीन व्हावी

कुणाची इतकेही ऐकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातूनही मग
त्याच्याच शब्दांचा उच्चार व्हावा

कुणाची अशीही सोबत असू नये
की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी
ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी

कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे ' मी पण ' आपण विसरुन जावे
त्या संभ्रमातून त्याने आपल्याला
ठेच देवून जागे करावे

पण, पण
कुणाच्या इतक्याही दूर जावू नये
की आपल्या सावली शिवाय सोबत काहीच नसावे