Thursday, July 22, 2010

घ्या एक ठाम निर्णय; जो बदलेल तुमचे जीवन:-
माझा जन्मच विजयासाठी झाला आहे.
मी एक योध्दा आहे, संकटांची भीती नाही मला.
जन्माबरोबरच सुरु झालेली स्पर्धा अखेरच्या क्षणापर्यंत चालणारच,
व्यक्‍ती म्हणून सर्वच जगतात, स्वत:साठी सर्वच जगतात
मी माझ्या आणि इतरांच्या स्वप्नांसाठी जगेन, लढेन.
मी जिंकायचं म्हणूनच जगणार!!!!
मी माझ्या जीवनाचे सार्थक करणारच!!!
मी यशाचे शिखर गाठणारच!!
मी माझे स्वप्न साकार करणारच!
जर वर्षभराचंच उद्दिष्ट असेल, तर फुले फुलवा.
दशकभराची योजना असेल, तर झाडे लावा.
आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी काही करायचे असेल, तर माणसं घडवा.
जर वर्षभराचंच उद्दिष्ट असेल, तर फुले फुलवा.
दशकभराची योजना असेल, तर झाडे लावा.
आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी काही करायचे असेल, तर माणसं घडवा.

Thursday, February 18, 2010

शोध....

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,
सावलीशिवाय ,"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,
सावली नकोस शोधु , ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव , डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,



सवयींचे काय , त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.