आज अस वाटलं की कोणी
जिवनात माझ्या डोकाउन गेलं
आज अस वाटलं की कोणी
मनात माझ्या पाहून गेलं
माझे डोळे बदं होते त्यावेळी
आणि श्वास जणू यांबला होता
मग असं वाटलं की कोणी
ह्दयाचे टोके कोणी मोजून गेलं
आज अस वाटलं की कोणी
जणू केस माझे कुरवाळून गेलं
आज अस वाटलं की कोणी
जणू पदराने मला झाकून गेलं
मला आटवतयं उश्याकडे कागंद
होती आणि हातात पेन होता
आज अस वाटलं की मानेखाली
मग उशी कोणी सरकवुन गेलं
आज अस वाटलं की कोणी
जणू दु:ख माझं जाणून गेलं
आज अस वाटलं की कोणी
जणू डोळे माझे पुसून गेलं
हो ती नक्कीच माझी माय होती
माझी आई आणी कोणी नाही
मग पदराने डोळो पुसले कोणी
आणि देवापुटे हात कोणी जोडून गेलं.