स्वप्न ...
हे आभाळ, हा आदित्य,
हे तेज, हे चैतन्य,
ही सांज, हे क्षितिज
हा सागर, हा साहिल,
हा आनंद, हे स्नेह,
ही प्रिती, ही स्म्रिती,
हे स्वप्न, हे विश्व,
सारं काही .....
सारं सारं काही.... आज,
मी माझ्या डोळयांत भरलं आहे,
माझ्या मनांत भरलं आहे,
माझ्या मिठीत घेतलं आहे,
होय, हे स्वप्न, हे विश्व ...
आज मी माझं केलं आहे....
.................... चक्रवर्ती...