Wednesday, May 28, 2008

भास

तू तशीच मीही तोच
दुराव्याचा भास का?
प्रिती तीच, बंध तेच
तुटण्याचा भास का?.....||१||

प्रत्येकवेळी भेटताना उमटणारे शब्द तेच
त्याच शब्दांना आता मौनाचे भास का?.....||२||

सहजपणे गालावर उमटणारे हास्य तेच
हास्यवेळी नयनाची पाणावली किनार का?.....||३||

मैफलीत सुह्रुदांच्या भेटतो आनंद तोच
गर्दीतही सुह्रुदांच्या विरहाचा भास का?.....||४||

नजरेत असती स्वप्ने रंगणारी रोजचीच
त्याही स्वप्नांना आता विरण्याचे भास का?.....||५||

कल्पनेच्या पाखराला क्षितिजाचा ध्यास तोच
वेदनेच्या कुंपणाचे पाखराला भास का?.....||६||

जाणीव आहे बंधनाची, समजूत घालतो मनाची
पण वेड्या या मनाला मीलनाचे भास का?.....||७|| >
ओंकार खरे