Wednesday, May 21, 2008

एक क्षण

एक क्षण


एक क्षण पुरेसा सर्व काही समजण्यासाठी
अनेक क्षणही कमी पडतात कधी कधी समजावण्यासाठी
किती लागणार एखाद्याच्यापाठी

कित्येक क्षण वाया गेले झुरताना तिच्यासाठी
कळतच नाही इथे कोणाला कोण रडतो कशासाठी
कळतच नाही इथे कोणाला कोण झुरतो कशासाठी

कुठेतरी आस असते दोनवेळच्या अन्नासाठी
कुठेतरी तहान असते प्रेमाच्या दोन शब्दांसाठी

दोन क्षणही पुरेसे आहेत तुझ्यासोबत जगण्यासाठी
एक क्षणही जास्त आहे तुझ्या विरहासाठी
ढगांना हवा असतो गारवा, पाऊस होऊन कोसळण्यासाठी ...!

...................[ई-मेल फौरवर्ड ... आभार - त्रिवेणी आणि कवी]