तु असतीस तर
तु असतीस तर झाले असते
सखे उन्हाचे गोड चांदणे
मोहरले असते मौनातुन
एक दिवाने नवथर गाणे
बकुळुच्या फुलापरी नाजुक
फुलले असते गंधाने क्षण
आणि रंगानी केले असते
क्षितिजावर खिन्न रितेपण
पसरली असती छायांनी
चरणातली म्रूद्शामल मखमल
आणि शुक्रांनी केले असते
स्वागत अपुले हसुन मिश्किल
तु असतीस तर झाले असते
आहे त्याहुन हे जग सुंदर
चांदण्यात विरघळले असते
गगन धरेतील धुसर अंतर ...
.... कवि - मंगेश पाडगावकर
[आभार त्रिवेणी]