आयुष्य खुप सुंदर आहे,
Posted by Guru
आयुष्य खुप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहुन गलं,
म्हणुन रडत बसु नका,
वेगळ असं काही, माझ्यात खास नाही असं म्हणुन उदास होऊ नका
मॄगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अखंडता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणत रडु नका
अंधाराला जाळणारा एक सुर्य तुमच्यातही लपला आहे!
आव्हान करा त्या सुर्याला!!!
मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नविन क्षितिज घेऊन,
अंधारमय रात्र संपवुन सोनेरी कीरणांनी सजुन
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणुन ...
आयुष्य खुप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
..... कविचे आभार [ई-मेल फोरवर्ड]