Thursday, May 22, 2008

सूर्य ..!

सूर्य ..!
Posted by Guru


तहानलेला सुर्य
क्षितिजावर बसुन
हळुच वाकतो
नदीत डोकावतो
नदीतलं पाणी
उष्ट करताना
सुर्याचं तेज त्यात सांडतं
त्या तेजोमय नदीत पुढे
सुर्य तसाच विरघळतो...!

.............. चक्रवर्ती